घोटाळेबाजांनी लाटलेले १८०० कोटी काढून घ्या
By admin | Published: September 11, 2015 05:28 AM2015-09-11T05:28:45+5:302015-09-11T05:28:45+5:30
सत्यम् कॉम्प्युटर्स या कंपनीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून अवैध मार्गाने कमावलेल्या आणि संस्थापक बी. रामलिंगम राजू यांच्याशी संबंधित असलेल्या घोटाळ्यातील
मुंबई : सत्यम् कॉम्प्युटर्स या कंपनीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून अवैध मार्गाने कमावलेल्या आणि संस्थापक बी. रामलिंगम राजू यांच्याशी संबंधित असलेल्या घोटाळ्यातील १० लाभार्थींनी १,८०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम संस्थांनी परत करावी, असा आदेश वित्तीय बाजाराचे नियमन करणाऱ्या ‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया’ (सेबी)ने दिला आहे.
हा घोटाळा उघड झाल्यानंतर सात वर्षांनी हा आदेश दिला गेला आहे. गैरव्यवहार करून घोटाळेबाजांंनी लबाडीने कमावलेला लाभ त्यांच्या घशातून काढून घेण्याच्या अशा प्रकारच्या आदेशास ‘सेबी’च्या परिभाषेत ‘डिसगॉर्जमेंट आॅर्डर’ म्हटले जाते.
रामलिंगम राजू यांनी आपल्या या कंपनीची खातेपुस्तके लिहिताना कित्येक वर्षे मोठा घोटाळा केला गेल्याची कबुली ज्या
दिवशी स्वत:हून दिली त्या दिवसापासून (७ जानेवारी २००९) या १० व्यक्ती व संस्थांनी व्याजापोटी आणखी सुमारे १,५०० कोटी
रुपयेही द्यायचे आहेत. कंपनीच्या वास्तविक वित्तीय स्थितीविषयी असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करून (इन्सायजर ट्रेडिंग) अनुचित लाभ घेतल्याबद्दल हा आदेश दिला गेला आहे.
दरम्यान, आयएल अॅण्ड एफएस इंजिनियरिंग व कन्स्ट्रक्शन कंपनी ही सत्यम कॉम्प्युटर्स किंवा मेटास यांच्या संदर्भात ‘इन्सायडर’ नव्हती किंवा कंपनीविषयीची अप्रकाशित संवेनशील
माहितीही त्यांना उपलब्ध नव्हती, असे नमूद करून ‘सेबी’ने या कंपनीविरुद्ध बाजारात व्यवाहर करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढलेला नाही. (विशेष प्रतिनिधी)