गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

By Admin | Published: April 30, 2017 12:23 PM2017-04-30T12:23:14+5:302017-04-30T12:23:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली

Remove the red light from the vehicle like a car - Narendra Modi | गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.

परीक्षा आता संपलेल्या आहेत. तरुणांनी नवे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, टेक्नॉलॉजीपासून दूर जात स्वतःसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, संगीतासारखी वाद्ये शिका किंवा नवीन भाषा शिका, असं आवाहनही त्यांनी देशातील तरुणांना केलं आहे. कोणत्याही ठिकाणी गेल्यास तिथे खूप फिरा, कमीत कमी 3 ते 4 दिवस तिथे थांबा आणि मगच दुस-या ठिकाणी जा, नव्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यास तिथे खूप शिकायला मिळते, फिरताना फोटो काढा आणि ते #IncredibleIndia सोबत शेअर करा, असंही ते म्हणाले आहेत. निसर्गाने सारे नियम बदलले आहेत.

पूर्वी मे-जूनमध्ये उष्णता जाणवायची. आता मार्च-एप्रिलमध्ये तसा अनुभव येतो, जागतिक तापमान वाढ हा एकेकाळी शैक्षणिक अभ्यासाचा विषय होता. आज तो दैनंदिन अनुभवाचा विषय ठरला आहे. कधी कधी आपण एवढे कामात व्यस्त होतो की, उन्हाळ्याच्या दिवसात घरी आलेल्या पोस्टमनला साधे पाणीही विचारत नाही, मात्र असं न करता या कडक उन्हाळ्यात सगळ्यांना पाणी द्या, पाणी बचतीचं महत्त्व जपा, उन्हापासून स्वतःचं आणि आपल्या माणसांचं संरक्षण करा. 5 मे रोजी भारत दक्षिण आशिया सॅटेलाइट लाँच करणार असून, दक्षिण आशियासोबत सहकार्य वाढवण्यासाठी भारताचं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

Web Title: Remove the red light from the vehicle like a car - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.