ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा 'सुपर ड्राईव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 08:38 AM2019-06-19T08:38:24+5:302019-06-19T08:38:30+5:30

समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही.

Removing act to the 8th pass certificate for driving license, Nitin gadkari take dicision | ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा 'सुपर ड्राईव्ह'

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा 'सुपर ड्राईव्ह'

Next

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करण्यात येते. देशातील महामार्ग रस्त्यांचा होत असलेला विकास पाहून गडकरींना रोडकरी असेही संबोधले जाते. तर, एक दूरदृष्टी जपणारा केंद्रातील मराठी नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही दळणवळणमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही. कारण, वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी सरकारने 8 वी पास असणे बंधनकारक केले होते. मात्र, नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे, यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही ड्रायव्हींग लायसन्स म्हणजेच, वाहनचालक परवाना काढण्यास पात्र ठरणार आहे. देशातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सद्यस्थितीत 22 लाखांपेक्षा अधिक ड्रायव्हरांची गरज आहे. त्यामुळे, दूरदृष्टी आणि रोजगार याचा विचार करुन गडकरींच्या अधिपत्याखाली दळणवळण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत, खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमावली 1989 या कायद्यात सुधारणा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरींच्या या निर्णयामुळे अशिक्षीत किंवा अडाणी व्यक्तीलाही वाहनचालकाचा परवाना काढता येईल. त्यामुळे बेरोजगारांना चांगली संधी आहे.  दरम्यान, ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी देशात 2 लाख स्कील सेंटरही उभारण्यात येणार आहेत. 



 

Web Title: Removing act to the 8th pass certificate for driving license, Nitin gadkari take dicision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.