प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असूनही स्वत:ला वाचवू शकला नाही; ४१ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 04:36 PM2023-06-06T16:36:43+5:302023-06-06T16:37:43+5:30

gaurav gandhi cardiologist : वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी डॉ.गौरव गांधी यांच्या निधनामुळे डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे.

  Renowned cardiologist doctor gaurav gandhi from Jamnagar, Gujarat passed away due to heart attack | प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असूनही स्वत:ला वाचवू शकला नाही; ४१ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असूनही स्वत:ला वाचवू शकला नाही; ४१ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

googlenewsNext

gaurav gandhi jamnagar । अहमदाबाद : देशातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच गुजरातमधील जामनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनगर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गौरव गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ४१ वर्षीय गौरव गांधी यांना जामनगरसह आजूबाजूच्या परिसरात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली असून एवढा तरूण कसा काय हृदयविकाराच्या झटक्याचा बळी ठरू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यानं अनेकांना या आजारातून बाहेर काढलं तोच याचा शिकार झाल्याने अनेकांना धक्का बसला. 

इस्पितळात जात होते गांधी
वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी डॉ.गौरव गांधी यांच्या निधनामुळे डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या वाढत्या घटनांना आळा कसा घालायचा? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. गौरव गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते घरून इस्पितळाकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि छातीत जोराने दुखू लागल्याने त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. गौरव गांधी यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गांधी यांच्या निधनाने एकच शांतता पसरली. इस्पितळाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमू लागली. 

हृदयविकारामुळे मृत्यू 
गौरव गांधी यांनी एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण जामनगर येथून घेतले होते. त्यानंतर कॉर्डियोलॉजीच्या शिक्षणासाठी त्यांनी अहमदाबाद गाठले. तेव्हापासून गांधी जामनगरमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर उपचार करत होते. त्यांनी अल्पावधीतच त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी परिसरात नावलौकिक मिळवला होता. 

दरम्यान, डॉ. गांधी स्वत: हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी देवदूत होते पण आज याच आजाराने त्यांना रूग्णांपासून कायमचे दूर नेले. हृदयविकाराचा झटका कसा थांबवला जाईल या अभियानात ते सहभाही होते आणि या झटक्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ते लोकांना जागरूक करत होते. फेसबुकवर बनवलेल्या ग्रुपमध्ये त्यांच्या अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात ते हृदयविकाराने त्रासलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Web Title:   Renowned cardiologist doctor gaurav gandhi from Jamnagar, Gujarat passed away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.