सहा तास वीजपुरवठा बंद पूर्वसूचना न देता दुरुस्तीची कामे : नागरिक हैराण, अनेक भागात तक्रारी
By Admin | Published: February 14, 2016 12:41 AM2016-02-14T00:41:55+5:302016-02-14T00:41:55+5:30
जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते.
ज गाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते. नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांना उत्तरे देताना महावितरणच्या अधिकार्यांचीही भंबेरी उडाली. काही नागरिक तर तक्रारी घेऊन थेट कोंबडी बाजारमधील महावितरणच्या पॉवर हाऊसमध्ये पोहोचले. त्यांना दुरुस्तीची कामे सुरू असल्याने वीज बंद केली, असे स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिले. या भागात वीज गुलशहरात रिंगरोड, गणेश कॉलनी, भगवाननगर, भगवाननगर, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केट आदी भागात वीजपुरवठा तब्बल सहा तास बंद होता. यापैकी काही भागात सकाळी नऊ ते चार आणि काही भागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान वीज बंद करण्यात आली होती. लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा...वीज दीर्घकाळ बंद असल्याने लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याची विचारणा थेट महावितरणच्या कार्यालयात नागरिकांनी केली. त्यावर दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने वीज बंद करावी लागली, असे स्पष्टीकरण अधिकार्यांनी नागरिकांना दिले. पूर्वसूचना पोहोचलीच नाहीकुठलेही दुरुस्तीचे किंवा इतर काम हाती घेताना वीजपुरवठा बंद करावा लागतो. तो चार ते सहा तास बंद करायचा असतो. यापेक्षा अधिक वेळ तो बंद करता येत नाही. पण वीजपुरवठा बंद करताना त्याची पूर्वसूचना वृत्तपत्र किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसिद्ध, प्रसारित करावी लागते. नेमकी हीच प्रसिद्धी किंवा वीज बंद ठेवण्याबाबतची माहिती महावितरणतर्फे शनिवारी देण्यात आली नाही आणि कामे हाती घेण्यात आली. ती सायंकाळपर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले. दोन विभागांमध्ये कामेमहावितरणचे शहरात दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागांमधील १० फिडरची वीज बंद केली होती. त्यासंदर्भात दोन अतिरिक्त कार्यकारी अभियंता, १६ अभियंता कार्यवाहीसाठी नियुक्त केले होते. अर्थातच वीज बंद केल्याची पूर्वसूचना न देण्यास हे अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर शहराची जबाबदारी पार पाडणारे कार्यकारी अभियंता एस.एस.सदामते यांनी आपल्या अधिकार्यांना विचारणा केल्याची माहिती मिळाली.