शेतकऱ्यांकडून आकारलेले कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 06:25 AM2023-06-05T06:25:54+5:302023-06-05T06:27:07+5:30
हरयाणात खट्टर सरकार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड :हरयाणात खट्टर सरकार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम व्याजासह जमा केली आहे, त्यांना ही रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खट्टर सरकारने प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज दिले आहे. या सोसायट्या दरवर्षी शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी मोठी मदत होते.
हरयाणात सध्या ७५१ सहकारी संस्था असून, त्याद्वारे राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. खट्टर सरकार सहकारी संस्थांद्वारे शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देत आहे आणि हरयाणा सरकार व केंद्र सरकार कर्जावर मिळणाऱ्या व्याजाच्या ४ टक्के भार सहन करत आहे.