बंगळुरूनंतर आता जोधपूरमध्ये... पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 22:04 IST2024-12-12T22:04:31+5:302024-12-12T22:04:53+5:30

Jodhpur Doctor Suicide Case : राजस्थानमधील जोधपूर येथे ३५ वर्षीय होमिओपॅथिक डॉक्टर अजय कुमार यांनी ११ डिसेंबरला आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Replay Of Bengaluru Techie Death: Homeopathic Doctor Dies By Suicide In Jodhpur | बंगळुरूनंतर आता जोधपूरमध्ये... पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या

बंगळुरूनंतर आता जोधपूरमध्ये... पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पतीची आत्महत्या

Jodhpur Doctor Suicide Case : दोन दिवसांपूर्वी बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानमधील जोधपूर येथे ३५ वर्षीय होमिओपॅथिक डॉक्टर अजय कुमार यांनी ११ डिसेंबरला आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अजय कुमार यांनी आपली पत्नी सुमन हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  अजय कुमार हे जोधपूरच्या कीर्ती नगर येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. क्लिनिकमध्ये असताना अजय कुमार कॉल्स रिसिव्ह करत नव्हते, त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना चिंता वाटली. त्यानंतर त्यांचा एक सहकारी क्लिनिकमध्ये पोहोचला, त्यावेळी अजय कुमार हे लटकलेल्या अवस्थेत दिसले. याबाबतची लगेच पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अजय कुमार यांनी पत्नी सुमनवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, नोटमध्ये त्यांनी आपला संघर्ष आणि निराशा व्यक्त केली. पोलिसांनी सांगितले की, अजय कुमार गेल्या तीन वर्षांपासून एका आयुर्वेदिक विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि काही दिवसांपासून जोधपूरमध्ये राहत होते.अजय कुमार आणि सुमन यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे, जो सध्या जयपूरमध्ये सुमनसोबत राहतो. 

सुमनने अजय कुमार यांचा बराच काळ मानसिक छळ केला, त्यामुळे ते खूप तणावाखाली होते, असा अरोप अजय कुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, अजय कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सुसाईड नोट आणि कौटुंबिक वादाचा सखोल तपास करत आहेत. सध्या सर्व बाजू लक्षात घेऊन हे प्रकरण सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Replay Of Bengaluru Techie Death: Homeopathic Doctor Dies By Suicide In Jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.