वाळूत साकारली शिवाजी महाराजांची प्रतिकृती
By Admin | Published: February 19, 2016 05:46 PM2016-02-19T17:46:28+5:302016-02-19T17:50:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ओरिसाच्या पुरी बीचवर आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाळूत प्रतिकृत्ती साकारली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुरी, दि. १९ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ओरिसाच्या पुरी बीचवर सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाळूत प्रतिकृत्ती साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, अनेक ठिकाणी भव्य मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले. मात्र सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाळूत प्रतिकृत्ती साकारुन जयंती साजरी केली. काल सुदर्शन पट्टनाईक यांनी पुरीच्या बीचवर वाळूत शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आणि त्यावर 'जय शिवाजी, जय भारत आणि एक खरा देशभक्त, असे लिहिले आहे.
सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पुरी यांनी आत्तापर्यंत अनेक वाळूत कलाकृती साकारल्या आहेत. तसेच, यासाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा भेटले आहेत. सुदर्शन पुरी हे नेहमीच वेगवेगळ्या कलाकृतीतून जगाला सतत एक संदेश देण्याचे काम करतात.
Today is #ChhatrapatiShivajiMaharaj 's birth anniversary,my sand art to tribute #ShivajiMaharaj at Puribeach,Odisha. pic.twitter.com/v4Ezv5Xoty
— sudarsan pattnaik (@sudarsansand) February 19, 2016