बीएचआरच्या संचालकांच्या २६ मालमत्ताचा अहवाल सादर अवसायक : एमपीआयडी कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव

By admin | Published: March 17, 2016 12:53 AM2016-03-17T00:53:04+5:302016-03-17T00:53:04+5:30

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे सादर केेले. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Report of 26 properties of BHR directors: Depositors present under the MPID Act | बीएचआरच्या संचालकांच्या २६ मालमत्ताचा अहवाल सादर अवसायक : एमपीआयडी कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव

बीएचआरच्या संचालकांच्या २६ मालमत्ताचा अहवाल सादर अवसायक : एमपीआयडी कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव

Next
गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे सादर केेले. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
बीएचआर पतसंस्थेला सेंट्रल रजिस्ट्रार, कृषि व सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी अवसायनात काढली होती. या संस्थेतील संचालक मंडळाने काही असुरक्षित कर्जाचे वाटप केले होते. त्या कर्जाच्या वसुलीची अडचण निर्माण झाली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सन २००८ ते २०१३ व अवसायकांनी पदभार घेईपर्यंतच्या संचालक मंडळाची यादी काढली. असुरक्षित कर्जाची वसुली होण्यासाठी व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी या संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यानुसार अवसायकांनी इंटनेटद्वारे संचालकांच्या २६ मालमत्तांचा शोध घेतला. या मालमत्तांचा एकत्रित अहवाल तयार करीत एमपीआयडी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Web Title: Report of 26 properties of BHR directors: Depositors present under the MPID Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.