सेंट्रल फुले मार्केटच्या ८०० गाळ्याचे सर्वेक्षण तलाठी आंदोलनाचा फटका : तहसीलदार आज जिल्हाधिकार्यांना अहवाल देणार
By admin | Published: April 29, 2016 12:29 AM2016-04-29T00:29:41+5:302016-04-29T00:29:41+5:30
जळगाव : सेंट्रल फुले मार्केटच्या जागेच्या मालकीचा वाद सुरू असतानाच या मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांनी सुमारे ८०० दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण करून तहसीलदार गोविंद शिंदे सर्वेक्षणाचा अहवाल संध्याकाळी जिल्हाधिकार्यांना सादर करणार आहेत.
Next
ज गाव : सेंट्रल फुले मार्केटच्या जागेच्या मालकीचा वाद सुरू असतानाच या मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांनी सुमारे ८०० दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण करून तहसीलदार गोविंद शिंदे सर्वेक्षणाचा अहवाल संध्याकाळी जिल्हाधिकार्यांना सादर करणार आहेत.२४ जणांकडून सेंट्रल फुले मार्केटचे सर्वेक्षणतहसीलदार गोविंद शिंदे यांनी या सर्वेक्षणासाठी १२ पथक तयार केले आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सर्वेक्षणात मनपाने गाळ्याची विक्री कुणाला केली आहे. सद्यस्थितीला या गाळ्यांमध्ये कुणाचे दुकान आहे. तसेच शॉप ॲक्ट लायसन्स कुणाच्या नावावर आहे. व्यापार्यांना जो गाळा देण्यात आला आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, याची तपासणी करीत आहेत. आज जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर1 सेंट्रल फुले मार्केटच्या व्यापार्यांनी फेडरेशन तयार करीत शासनाकडे काही दिवसांपूर्वी मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची विनंती केली आहे. या मार्केटमध्ये सुमारे ९१५ गाळे आहेत. त्यापैकी महसूल कर्मचार्यांनी दोन दिवसात ८०० गाळ्यांचे सर्वेक्षण केले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे.2 सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार गोविंद शिंदे हे आपला अहवाल जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना सादर करतील. त्यानंतर एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.3 सेंट्रल फुले मार्केटचे सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर महसूल विभागातील अव्वल कारकून व लिपीक याचे सर्वेक्षण करीत आहेत. तलाठी आपल्या मागण्यांसाठी संपावर असल्याने महसूल कर्मचार्यांना आपले दैनंदिन कामे तसेच सर्वेक्षणाचे काम करण्याची कसरत करावी लागत आहे. तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांमध्ये २४ कर्मचार्यांचा समावेश आहे. ८०० दुकानांचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण होऊन संध्याकाळी जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्यात येईल.-गोविंद शिंदे, तहसीलदार