कृषि विद्यापीठाचा अहवाल बाकी एकनाथराव खडसे: आंदोलने केवळ श्रेयासाठी धडपड

By admin | Published: January 22, 2016 10:40 PM2016-01-22T22:40:54+5:302016-01-22T22:40:54+5:30

जळगाव : कृषि विद्यापीठ जळगावला की धुळ्याला अद्याप कोणताही निर्णय नाही. या संदर्भात नियुक्त समितीचा अहवाल अद्यापही मिळाला नसल्याची माहिती महसूल तथा कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

Report of Agriculture University: The rest of the story: Ekanavrao Khadse: The agitation only stages for the Shreya | कृषि विद्यापीठाचा अहवाल बाकी एकनाथराव खडसे: आंदोलने केवळ श्रेयासाठी धडपड

कृषि विद्यापीठाचा अहवाल बाकी एकनाथराव खडसे: आंदोलने केवळ श्रेयासाठी धडपड

Next
गाव : कृषि विद्यापीठ जळगावला की धुळ्याला अद्याप कोणताही निर्णय नाही. या संदर्भात नियुक्त समितीचा अहवाल अद्यापही मिळाला नसल्याची माहिती महसूल तथा कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ (अकोला) व राहूरी कृषि विद्यापीठाचे विभाजन करून नवीन कृषि विद्यापीठ निर्मितीचा प्रस्ताव आहे. नव्याने निर्मित होणारे विद्यापीठ जळगाव जिल्‘ात आणण्याचा प्रयत्न असल्याचे यापूर्वी महसूल तथा कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले होते. मात्र हे विद्यापीठ धुळे येथेच व्हावे अशी धुळे येथून मागणी आहे. या मागणीसाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषि विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीतर्फे गुरुवारी धुळ्यात भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
श्रेयासाठी ही धडपड
धुळ्यातील आंदोलनकाडे खडसे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाली, अशी आंदोलने केवळ श्रेयासाठीची धडपड आहे.
मुळात कॉँग्रेसच्या राजवटीत नव्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अद्याप कोणताही अहवाल दिला नसल्याने सध्यातरी याप्रश्नी निर्णय नाही. अहवाल येईपर्यंत याबाबतच्या चर्चा, आंदोलने, निरर्थक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Report of Agriculture University: The rest of the story: Ekanavrao Khadse: The agitation only stages for the Shreya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.