आरोग्य, पर्यावरणीय समस्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:08 AM2018-09-10T05:08:37+5:302018-09-10T05:08:48+5:30

१२व्या एशियन काँग्रेस आॅफ ओरल अँड मॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजी आणि ५व्या इंटरनॅशनल ग्रीन हेल्थ कॉन्फरन्सचा समारोप रविवारी नेहरू विज्ञान केंद्रात पार पडला.

Report to Health, Environmental Issues Center | आरोग्य, पर्यावरणीय समस्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार

आरोग्य, पर्यावरणीय समस्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार

googlenewsNext

मुंबई : १२व्या एशियन काँग्रेस आॅफ ओरल अँड मॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजी आणि ५व्या इंटरनॅशनल ग्रीन हेल्थ कॉन्फरन्सचा समारोप रविवारी नेहरू विज्ञान केंद्रात पार पडला. या परिषदेत चर्चा झालेल्या आरोग्य व पर्यावरण विषयक समस्यांचा अहवाल केंद्रासमोर सादर करणार असल्याचे तज्ज्ञांनी या वेळी सांगितले.
या चार दिवसीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक, डॉक्टर आणि अभ्यासकांनी जागतिक पातळीवर आरोग्य व पर्यावरण क्षेत्राशी
निगडित समस्यांवर चर्चा केली. या चर्चासत्रांत महाविद्यालयीन तरुणाई आणि शाळकरी विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्यात आले. नव्या पिढीतही विविध पद्धतीने याविषयी जनजागृती करण्याचा मानस
एशियन अकॅडमी आॅफ ओरल मॅक्सिफेसियल रेडिओलॉजीच्या अध्यक्षा डॉ. सुनाली खन्ना यांनी व्यक्त केला.
रविवारी, परिषदेच्या समारोपप्रसंगी, डॉ. सुनाली खन्ना यांनी इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ डेन्टोमॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजीचे अध्यक्ष डॉ.जी. याँग यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
डॉ. खन्ना यांनी अशा परिषदेचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करून जगभरातून उपस्थिती लावलेल्या संशोधक, अभ्यासकांचे आभार मानले. या वेळी डॉ. योशीनोरी अराइ, डॉ. सुर्ताजो सितम आदी उपस्थित होते.

Web Title: Report to Health, Environmental Issues Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर