तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचा कॉन्ट्रॅक्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:26 PM2021-01-25T16:26:53+5:302021-01-25T16:29:44+5:30
तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा कुठे तयार केला जातो? तो कोण तयार करतं? चला जाणून घेऊ या गोष्टी....
देशात ७२व्या प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष बघायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यासहीत राजधानी दिल्लीतील राजपथावर देशाची शान असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला जाईल. तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा कुठे तयार केला जातो? तो कोण तयार करतं? चला जाणून घेऊ या गोष्टी....
कुठे केला जातो तयार?
देशातील अधिकारिक झंडा तयार करण्याचा अधिकार केवळ एका कंपनीकडे आहे. म्हणजे सरकारी समारोह आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये फडकवला जाणारा झंडा तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट कर्नाटकातील खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडे आहे. ही देशातील एकुलती ऑथराइज्ड राष्ट्रीय ध्वज तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी हुबलीच्या बेंगेरी परिसरात स्थित आहे आणि याला हुबली यूनिटही म्हटलं जातं. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची स्थापना नोव्हेंबर १९५७ मध्ये झाली होती. त्यांनी १९८२ मध्ये खादी बनवणं सुरू केलं.
तिरंगा बनवण्याचे टप्पे
तिरंगा अनेक टप्प्यांनंतर तयार होतो. ज्यात धागा तयार करणं, कपडा तयार करणं, ब्लीचिंग व डाइंग चक्राची छपाई, तीन पट्ट्यांची शिलाई, इस्त्री करणं आणि टॉगलिंग यांचा समावेश आहे. राष्ट्रीय ध्वजाची क्वालिटी BIS चेक करतात. प्रत्येक सेक्शनमध्ये एकूण १८ वेळा तिरंग्याची क्वालिटी चेक केली जाते.
कोणकोणता तिरंगा अधिकृत
- सरकारी मीटिंग्स आणि कॉन्फरन्स इत्यादी टेबलवर ठेवला जाणाऱ्या झंड्याला अधिकारिक महत्व प्राप्त आहे.
- संवैधानिक पदांवर असलेल्या व्हीव्हीआयपी कार्ससाठी...
- संसद आणि मंत्रालयांच्या रूम्समध्ये क्रॉस बारवर दिसणारे झंडे अधिकारिक असतात.
- सरकारी कार्यालये आणि छोट्या इमारतींवर लावल्या जाणाऱ्या झंड्यांना अधिकारिक दर्जा प्राप्त आहे.
- इतकेच नाही तर शहीद सैनिकांच्या पार्थिवावर ठेवण्यासाठीही अधिकारिक ध्वजाचा वापर केला जातो.
- परेड करणाऱ्या सैनिकांच्या गन कॅरिएजवर लावलेला झंडाही अधिकारिक असतो.
- लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालये, संसद भवन, राष्ट्रपती भवन यांवर लागणारे झंडेही अधिकारिक आहेत.