Anand Mahindra : मोदी सरकारच्या 'या' कामाचं केलं कौतुक; चित्ररथ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'Game Changer'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:01 PM2022-01-26T20:01:08+5:302022-01-26T20:01:54+5:30
आनंद महिंद्रांनी ट्वीटरवरुन केलं कौतुक. पाहा काय म्हणाले...
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे (Mahindra and Mahindra Group) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या एका चित्ररथाचा फोटो शेअर केलाय. त्यांच्या आवडीच्या चित्ररथाच्या फोटोसह त्यांनी सुंदर पोस्टसह शेअर केली आणि सरकारच्या कामाची प्रशंसाही केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त, आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं आणि लोकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथाबद्दल विचारलं. "आम्ही लहानपणी २६ जानेवारीची परेड पाहायचो, तेव्हा आम्ही सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी आपापसात मतदान करायचो. या वर्षी तुम्ही कोणाला मतदान करता हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. माझ्या आवडीचा चित्ररथ नुकताचं गेला असं वाटतं," असं महिंद्रा यांनी नमूद केलं होतं.
This gets my vote for the best float in today’s parade. Because the Jal Jeevan mission is a game-changer in the quality of life for everyone.
— anand mahindra (@anandmahindra) January 26, 2022
At 14K ft high in Ladakh, near the IndoChina border, -20°C temperature, 24X7 tap water for households! https://t.co/VwPRItxlCIpic.twitter.com/gFeLkVF8ri
'जल जीवन मिशन'ला पसंती
आपल्या पहिल्या पोस्टनंतर काही तासांनी महिंद्रा यांनी आपल्या आवडत्या चित्ररथाचा व्हिडीओ शेअर केला. त्यांना जल जीवन मिशनचा चित्ररथ आवडला. माझं मत या चित्ररथाला, कारण जल जीवन मिशन प्रत्येकाच्या जीवनात गुणवत्तापूर्ण बदल करण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. लडाखमध्येही १४ हजार फुटांच्या उंचीवर भारत चीन सीमेजेवळ उणे २० डिग्री तापमानातही २४*७ पाणी मिळेल, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, जल जीवन मिशन सुरू करण्याची घोषणा केली होती. २०२४ पर्यंत गावागावांमध्ये प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं हे या मागील उद्देश होतं.