Republic Day 2022: राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 02:55 PM2022-01-26T14:55:05+5:302022-01-26T14:55:48+5:30

Republic Day 2022: गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैमानिक होत्या.

Republic Day 2022: Shivangi Singh, India’s first woman pilot to fly Rafale, at Republic Day parade | Republic Day 2022: राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

Republic Day 2022: राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

Next

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा समावेश होता. यामध्ये राफेल उडवणारी देशातील पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह देखील सहभागी झाल्या होत्या. शिवांगी सिंह या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या दुसरी महिला फायटर पायलट आहेत. गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैमानिक होत्या.

वाराणसीमध्ये राहणाऱ्या शिवांगी सिंह या 2017 मध्ये भारतीय वायू दलात रुजू झाल्या होत्या. त्या वायू दलाच्या महिला लढाऊ विमानाच्या वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीचा भाग बनल्या. राफेल उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी मिग-21 बायसन विमानांचे उड्डाण केले आहे. शिवांगी सिंह या पंजाबमधील अंबाला येथील भारतीय वायू दलाच्या गोल्डन एरोज स्क्वाड्रनमधील आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात 'भारतीय वायुसेना, भविष्यासाठी बदल' असे वायू दलाच्या चित्ररथाचे शीर्षक होते. यावेळी मिग-21, जी-नेट, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि आश्लेषा रडारसह राफेल विमानांचे स्केल डाउन मॉडेल्स देखील या चित्ररथात दाखवण्यात आले. राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 29 जुलै 2020 रोजी भारतात पोहोचली. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या 36 लढाऊ विमानांपैकी आतापर्यंत 32 राफेल विमाने देशात आणली आहे. या वर्षी एप्रिलपर्यंत इतर चार राफेल विमाने भारतात आणली जाऊ शकतात.

मार्चिंग पथक
या वर्षी लष्कर आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या तिन्ही शाखांच्या मार्चिंग तुकड्यांनी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यासह सर्व मान्यवरांसमोर संचलन केले. यंदाच्या संचलनमध्ये सैन्याच्या 61 घोडदळ रेजिमेंटसह एकूण सहा मार्चिंग तुकड्या आहेत. ज्यामध्ये राजपूत रेजिमेंट, आसाम जॅकलाई, सिखलाई, AOC आणि पॅरा रेजिमेंट यांचा समावेश आहे. याशिवाय हवाई दल, नौदल, सीआरपीएफ, एसएसबी, दिल्ली पोलीस, एनसीसी आणि एनएसएसचे मार्चिंग टीम आणि बँड राजपथावर दिसतील. दरवर्षीप्रमाणे याही परेडमध्ये बीएसएफचे उंट पथक सहभागी होते. 

Web Title: Republic Day 2022: Shivangi Singh, India’s first woman pilot to fly Rafale, at Republic Day parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.