शासकीय आदेश म्हणूनच साजरा होतोय प्रजासत्ताकदिन

By admin | Published: January 26, 2017 02:09 AM2017-01-26T02:09:08+5:302017-01-26T02:09:08+5:30

जळगाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे स्वरूप बदलले आहे़ पूर्वी देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार हा दिवस आता, केवळ शासकीय आदेशानुसार साजरा होत आहे़ शाळा, महाविद्यालयांकडून जागरूकता व्हावी़ नागरिकांमधील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत सृज्ञ नागरिकांनी व्यक्त केले़

Republic Day celebrations as a government order | शासकीय आदेश म्हणूनच साजरा होतोय प्रजासत्ताकदिन

शासकीय आदेश म्हणूनच साजरा होतोय प्रजासत्ताकदिन

Next
गाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे स्वरूप बदलले आहे़ पूर्वी देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार हा दिवस आता, केवळ शासकीय आदेशानुसार साजरा होत आहे़ शाळा, महाविद्यालयांकडून जागरूकता व्हावी़ नागरिकांमधील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत सृज्ञ नागरिकांनी व्यक्त केले़
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर लोकमतने वृध्द, मध्यम वयातील पुरूष व तरूण या वयोगटातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या़ आजच्या तरूण पिढीला देशाविषयीच प्रेम नसून त्याच्याच देशभक्ती रूजविण्यामध्ये शाळा, महाविद्यालय व पालक हे कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवले़ शाळेत असताना तो प्रजासत्ताक दिवस साजरा केला त्यानंतर तसा प्रजासत्ताक दिवस कुठे साजरा होतानाच बघितले नसल्याचे मतही यावेळी तीन्ही वयोगटातील प्रतिक्रियांमधून समोर आले़ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींची बोटावर मोजण्याइतपत उपस्थिती असते़ देशाविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा नव्हे तर सुटीचा दिवस म्हणून तरूण पिढी या दिवसाकडे पाहते, ही शोकांतिका असून याला पालकही तेवढेच जबाबदार आहे़ पूर्वी अत्याधुनिक साधने नव्हती मात्र आता अत्याधुनिक साधनांमुळे प्रजासत्ताक दिवस सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे जल्लोषात साजरा होत असल्याचेही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या़
महाविद्यालयांकडून सक्ती व्हावी
शाळांमध्ये ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची जी गर्दी दिसून येते़ ती महाविद्यालयांमध्ये तरूण-तरूणींची दिसून येत नाही़ तरूणपिढीला प्रजासत्ताक दिनाचे काही घेणे देणं नाही़ शाळांमध्ये ज्यापध्दतीचे वातावरण असते ते महाविद्यालयात दिसून येत नाही़ बोटावर मोजण्याइतपत उपस्थिती असते़ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना हजर राहण्याबाबत सक्ती व्हावी़ जेणेकरून त्यांच्यात देशाविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होईल़ - सागर शरद जाधव, विद्यार्थी, कळमसरा, ता़पाचोरा
तरूणांमधील देशप्रेम आटले
पहिली ते दहावीपर्यंत शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला़ त्यानुसार आता साजरा होत असलेला प्रजासत्ताक दिनाचे स्वरूप बदलले आहे़ पालकांची मानसिकता यास कारणीभूत आहे़ तरूणपिढीला हा प्रजासत्ताक दिवस साजरा करणे कंटाळा वाटतोय, ही दुर्देवी बाब आहे़ त्यांना प्रजासत्ताक दिनाचा अर्थ कळतो तेवढेच जण तो साजरा करण्यासाठी हजेरी लावतात़ प्रजासत्ताकदिनाला उपस्थितांमध्ये तरूणांचे नगण्य प्रमाण आहे़ - गायत्री देशमुख, विद्यार्थीनी, बोरनार, ता़जळगाव

Web Title: Republic Day celebrations as a government order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.