प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 03:44 PM2018-01-25T15:44:55+5:302018-01-25T15:58:21+5:30

भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

Republic Day; Do you know about the President's Buggy? | प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Next

नवी दिल्ली- भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी विशेष बग्गीमधून येऊन सहभागी होतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती या पदावरुन प्रथमच या सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलकडून वापरली जायची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीच्यावेळेस अनेक वस्तू, वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षारक्षकांची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2:1 अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. आज त्याला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड असे म्हटले जाते. 

 गव्हर्नर जनरलच्या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितल्यावर तिच्या विभागणीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी नाणेफेक करुन तिची विभागणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षादलाच्या कमांडंटनी हा नाणेफेक करुन निर्णय दिला. राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या बग्गीला 6 ऑस्ट्रेलियन घोडे जुंपण्यात आले होते. 1984 पर्यंत या बग्गीचा उपयोग राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तिचा वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात तिचा पुन्हा वापर सुरु करण्यात आला.



पहिला प्रजासत्ताक सोहळा-
२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.

Web Title: Republic Day; Do you know about the President's Buggy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.