प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार अन् मग वीरमरण
By admin | Published: January 28, 2015 12:06 PM2015-01-28T12:06:10+5:302015-01-28T12:10:10+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीच कर्नल एम.एन. राय हे शहीद झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २८ - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीच कर्नल एम.एन. राय हे शहीद झाले आहे. राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदक जाहीर झाले होते. हा सर्वोच्च सन्मान जाहीर होऊन २४ तासांचा कालावधी लोटला असतानाच राय शहीद झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी पुलवामा येथील मिंडोरा येथे दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर कर्नल मुनिंद्रा नाथ राय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विभागाला चारही बाजूंनी घेरले व दहशतवाद्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात राय आणि जम्मू काश्मीर पोलिस दलातील एक कर्मचारी असे दोघे जण शहीद झाले. तर सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी राय शहीद झाले. राय हे ९ गोरखा रायफल्स आणि ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडीग ऑफीसर होते. बूधवारी सकाळी राय यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राय यांनी काही महिन्यांपूर्वी वॉट्स अॅपवर स्टेटस ठेवले होते. 'आयुष्यात तुमची भूमिका अशी निभवा की पडदा पडल्यावरही टाळ्या वाजत राहतील' असे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले होते.