देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 20:33 IST2025-01-25T19:37:52+5:302025-01-25T20:33:29+5:30
प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी पद्म पुरस्कार मिळालेल्यांची नावे जाहीर केली आहेत.

देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान
Padma awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजाच्या जनहितासाठी काम करणाऱ्या नायक आणि वीरांना देशाच्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Padma Awards 2025 | Unsung and unique Padma Awardees. Full list to be released shortly.
— ANI (@ANI) January 25, 2025
Dr Neerja Bhatla, a Gynaecologist from Delhi with specialized focus on cervical cancer detection, prevention and management being awarded Padma Shri.
Bhim Singh Bhavesh, social worker from… pic.twitter.com/tIkPS8Pzln
महाराष्ट्रातून तिघांचा सन्मान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. तसेच पर्यावरण आणि वनसंवर्धनात काम करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अरण्यऋषी म्हणून ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी:
- एल हँगथिंग (नागालँड)
- हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
- जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)
- जोयनाचरण बाथरी (आसाम)
- नरेन गुरुंग (सिक्कीम)
- डॉ. विलास डांगरे (महाराष्ट्र)
- शेखा एजे अल सबाह (कुवैत)
- निर्मला देवी (बिहार)
- भीमसिंग भावेश (बिहार)
- राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)
- सुरेश सोनी (गुजरात)
- पंडीराम मांडवी (छत्तीसगड)
- जोनास मॅसेट (ब्राझील)
- जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)
- हरविंदर सिंग (हरियाणा)
- भैरूसिंग चौहान (मध्य प्रदेश)
- व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)
- पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)
- लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
- गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
- ह्यू गँट्झर (उत्तराखंड)
- कॉलीन गँटझर (उत्तराखंड)
- डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)
- सायली होळकर (मध्य प्रदेश)
- मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)
परदेशी नागरिकांचाही सन्मान
शेखा एजे अल सबाः कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी त्यांच्या देशातील पहिला परवानाधारक योग स्टुडिओ स्थापन केला. याद्वारे अल सबाहने आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आणि शम्स यूथ योगाची सह-स्थापना केली.
जोनास मॅसेट: ब्राझिलियन मेकॅनिकल अभियंता हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणही त्यांनी सोपे केले. २०१४ मध्ये त्यांनी विश्वविद्येची स्थापना केली. त्याचे कार्यालय रिओ दि जानेरो येथे आहे.