मुस्लीम समाजाच्या समस्या सोडविण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:58+5:302016-03-23T00:09:58+5:30
जळगाव : भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष हाजी हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असे हाजी हैदर आझम यांनी सांगितले.
Next
ज गाव : भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष हाजी हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असे हाजी हैदर आझम यांनी सांगितले.यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.राज्यातील मशिदींचे वाढीव बांधकाम नियमित करावे. कब्रस्थानांना संरक्षण भिंती बांधून द्याव्यात, अल्पसंख्याक समाजाशी संबंधित राज्यस्तरीय व जिल्हा शासकीय समित्यांची लवकरात लवकर स्थापना करावी अशा मागण्या हाजी हैदर आझम यांनी केल्या. त्यांनी सांगितले की, मशिद व मदरसांचे २००९ पर्यंत झालेले बांधकाम नियमित करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.राज्य मुस्लीम समन्वय समितीचे उपाध्यक्ष रागीब अहमद यांनी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक जिल्ात त्यांचे कार्यालय सुरू करावे, तसेच अल्पसंख्याकांसाठी विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करावे व पंतप्रधानांच्या पंधरा सूत्री कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक समितीचे स्थापना करावी, अशा मागण्या केल्या.पत्रकार सर्फराज आरजू यांनी शासकीय जाहिराती देताना उर्दू वृत्तपत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष खान शमीम बानो यांनी महिला आयोगात मुस्लीम महिलांना प्रतिनिधीत्व द्यावे, अशी विनंती केली.भाजपा मुंबई अल्पसंख्य मोर्चा सचिव आलिया शेख यांनी मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये महिलांसाठी आधार भवन बांधावेत, अशी मागणी केली. फारूख सारंग यांनी अंधेरी येथील ईदगाहच्या जागेची समस्या सोडविण्याची विनंती केली. फारूख आझम यांनी मुख्यमंत्र्यांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्या मुख्यमंत्री पूर्ण करताल, असे सांगितले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष डॉ.अहमद राणा, इफ्तिकार हसन अमरोही, मुंबई भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष वसीम खान, राझी हैदर, रईस अहमद व गुफरान शेख उपस्थित होते. अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.