हिमाचलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे २० लोकांची सुटका; महिलांनी स्वत: तयार केले हेलिपॅड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:04 PM2023-08-16T17:04:02+5:302023-08-16T17:05:02+5:30

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले २० ते २५ भाविक अडकले होते.

Rescue of 20 people by helicopter in Himachal; The women built their own helipad | हिमाचलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे २० लोकांची सुटका; महिलांनी स्वत: तयार केले हेलिपॅड

हिमाचलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे २० लोकांची सुटका; महिलांनी स्वत: तयार केले हेलिपॅड

googlenewsNext

नवी दिल्ली: हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये पावसाशी संबंधित भूस्खलन आणि ढगफुटी संबंधित घटनांमध्ये ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच येत्या २४ तासांत येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे ९५०हून अधिक रस्ते बंद आहेत.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले २० ते २५ भाविक अडकले. प्रत्यक्षात मध्यमहेश्वर धाम आणि महामार्गादरम्यान एक पूल होता जो पावसामुळे कोसळल्याने संपर्क तुटला होता. प्रशासनाने हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू केले, मात्र धाममध्ये उतरण्याची जागा नव्हती. त्यानंतर ७ हून अधिक स्थानिक महिला पुढे आल्या आणि त्यांनी काही तासांत हेलिपॅड तयार केले. त्यानंतरच अडकलेल्यांची सुटका करण्यात आली.

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलनात एक घर कोसळले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. पिपळकोटी ते जोशीमठ दरम्यान बद्रीनाथ महामार्गावरील हेलंग गावात मंगळवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्यातील पिपळकोटी, गडोरा, नवोदय विद्यालय पिपळकोटी, गुलाबकोटी, पागलनाला आणि विष्णुप्रयाग भागात महामार्गाचे नुकसान झाले आहे.

या शहरांना सर्वाधिक धोका आहे

संततधार पावसामुळे हवामान खात्याला सर्वात मोठा धोका हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांना आहे. संचालक सुरेंद्र पाल यांचे म्हणणे आहे की, संततधार पावसामुळे भूस्खलन आणि चिखलाचा धोका असलेल्या शहरांमध्ये शिमला, सोलन, मंडी, कुल्लू, बिलासपूर आणि सिरमौरसह अनेक प्रमुख जिल्हे आणि त्यांच्या शहरांचा समावेश आहे. किंबहुना, डोंगरावर वसलेल्या या शहरांची लोकसंख्या तर वाढतच गेली, पण इथे बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली. याशिवाय हिमाचल प्रदेशातील बहुतांश धरणे आणि बॅरेजेस तुडुंब भरल्याने हवामान खात्यालाही चिंता आहे. त्यामुळे डोंगराच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे डोंगरावरील जमिनीतील ओलावा तर वाढेलच पण ती कमकुवत होऊ शकते.

Web Title: Rescue of 20 people by helicopter in Himachal; The women built their own helipad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.