अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवशेषांचा शोध
By admin | Published: December 30, 2014 11:40 PM2014-12-30T23:40:40+5:302014-12-30T23:40:40+5:30
विमानाचा मोठा भाग कुठे बुडाला हे शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जकार्ता : विमानाचा मोठा भाग कुठे बुडाला हे शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या विमानाच्या शोधमोहिमेत तीन जहाजे, १५ विमाने व ७ हेलिकॉप्टर सहभागी आहेत. इंडोनेशियाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत मलेशिया, सिंगापूर व आॅस्ट्रेलियाने सहभाग घेतला तर भारत, दक्षिण कोरिया, चीन आणि फ्रान्सने मदतीचा प्रस्ताव दिला होता.
इंडोनेशियाहून सिंगापूरसाठी उड्डाण घेतलेल्या या विमानातील प्रवाशांत १७ मुलांचा समावेश होता. विमानात एकही भारतीय नव्हता.
(वृत्तसंस्था)
शोकांतिका... इंडोनेशियाहून उड्डाण घेतल्यानंतर रविवारपासून बेपत्ता असलेले विमान समुद्रात कोसळल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर प्रवासी जिवंत असण्याच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या. पहिल्या छायाचित्रात शोधमोहिमेदरम्यान जावा बेटाजवळ समुद्रात सापडलेल्या बेपत्ता विमानातील वस्तू दाखविताना इंडोनेशियाचे अधिकारी. समुद्रात मृतदेह सापडल्याचे वृत्त समजल्यानंतर सुराबाया विमानतळावर प्रवाशांच्या नातेवाईकांना रडे कोसळले (दुसरे व तिसरे छायाचित्र). समुद्रात तरंगत असलेले विमानाचे अवशेष (चौथे व पाचवे छायाचित्र). सहाव्या छायाचित्रात सिंगापूर हवाई दलाचे कर्मचारी समुद्रात बेपत्ता विमानाचा शोध घेत असताना.