OBC, EWS Reservation: ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी केंद्राचा मोठा निर्णय; मेडिकल प्रवेशासाठी यंदापासूनच आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:46 PM2021-07-29T15:46:25+5:302021-07-29T15:58:36+5:30
OBC, EWS Category Reservation Declared center for medical courses: दोन्ही घटकांना आरक्षण (obc ews quota) देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे.
राज्यात आरक्षणावरून (Reservation issue) गोंधळ सुरु असताना केंद्र सरकारने (Central Government) यंदाच्या वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक प्रवेशांसाठी देशभरात यंदा ओबीसी (OBC) आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांना आरक्षण देण्यात आले आहे. याचा फायदा जवळपास साडे पाच हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. (OBC, EWS Category Reservation Declaired for medical students. Nearly 5,550 students will be benefitted. )
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nearly 5,550 students will be benefitted. Government is committed to providing due reservation both to Backward Category and EWS Category: Ministry of Health and Family Welfare
— ANI (@ANI) July 29, 2021
मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे. या आरक्षणातून एमबीबीएस, एमी, एमएस, डिप्लोमा, बीडीएस, एमडीएसच्या 2021-22 व यानंतरच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळणार आहे. या दोन्ही घटकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.