महिलांना आरक्षण : काँग्रेसची घोषणा
By admin | Published: January 10, 2017 01:23 AM2017-01-10T01:23:52+5:302017-01-10T01:23:52+5:30
महिलांसाठी आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण आदी आश्वासने देणारा काँग्रेसचा जाहीरनामा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी जाहीर
शीलेश शर्मा / नवी दिल्ली
महिलांसाठी आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण आदी आश्वासने देणारा काँग्रेसचा जाहीरनामा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला. पंजाबला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा शब्दही यात दिला आहे. पंजाबला आज कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे मत या वेळी मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.
या वेळी कॅप्टन अमरिंदर सिंग, अंबिका सोनी, आशा कुमारी आणि राजेंद्र कौर भट्टल यांची उपस्थिती होती. पंजाबमध्ये पूर्ण ताकद लावली आहे. भाजपा-अकाली दलावर हल्ला करताना, मनमोहन सिंग म्हणाले की, ‘सरकारने राज्याची अर्थव्यवस्था बिघडवून टाकली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नेतृत्व राज्याला चांगले भविष्य देऊ शकते.’
काँग्रेसने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मनमोहन सिंग यांना पुढे आणले. शीख मतदारातही संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, ‘पंजाबचे पाणी पंजाबसाठी आहे. पाण्यावरून हरियाणा आणि पाकिस्तानात वाद होत आहेत.’ पंजाबच्या शेतकऱ्यांना अमरिंदर यांचा हा संदेश होता.