बहुमतानंतर महिलांना सर्वत्र आरक्षण
By admin | Published: February 11, 2017 01:05 AM2017-02-11T01:05:56+5:302017-02-11T01:05:56+5:30
राज्यसभेत मोदी सरकारला (एनडीए) बहुमत मिळाले की प्रदीर्घ काळपासून प्रलंबित असलेले महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा ठेवणारे विधेयक संमत केले जाईल, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.
अमरावती (आंध्र प्रदेश) : राज्यसभेत मोदी सरकारला (एनडीए) बहुमत मिळाले की प्रदीर्घ काळपासून प्रलंबित असलेले महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा ठेवणारे विधेयक संमत केले जाईल, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.
शुक्रवारी येथे ते तीन दिवसांच्या राष्ट्रीय महिला संसदेत बोलत होते. नायडू म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या मनात हे विधेयक असून महिलांना ३३ टक्के राखीव जागा बहाल करणारे विधेयक संसद एकमताने संमत करील तो दिवस फार काही दूर नाही. आम्हाला (एनडीए) राज्यसभेत बहुमत मिळाले की आम्ही ते विधेयक संमत करू, असे मी माझ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, असे व्यंकय्या नायडू म्हणाले. महिलांना आवश्यक त्या नैतिक पाठिंब्यासह त्यांना योग्य ते स्थान आणि आवाज दिला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.