रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीतच आला होता मंदीचा अंदाज - गव्हर्नर दास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:41 AM2019-12-17T05:41:25+5:302019-12-17T05:41:53+5:30

फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात कपात केली आहे.

The Reserve Bank predicted a recession in February - Governor Das | रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीतच आला होता मंदीचा अंदाज - गव्हर्नर दास

रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीतच आला होता मंदीचा अंदाज - गव्हर्नर दास

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीमध्येच देशातील आर्थिक मंदीचा अंदाज आला होता. त्यामुळे बाजारात
प्रत्यक्ष मंदीचा प्रभाव स्पष्ट दिसण्यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात सुरू केली होती, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. 


दास यांनी सांगितले की, आर्थिक मंदीच्या संदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांनीही वेळेत हालचाली केलेल्या आहेत. आम्ही वेळे
आधीच धोरणात्मक व्याजदरात कपात केली. मंदीचे आगमन होत आहे, असे निदर्शनास येताच आम्ही व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली.
फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात कपात केली आहे. दास म्हणाले की, आम्ही फेब्रुवारीत पहिल्यांदा व्याजदर कपात केली, तेव्हा बाजाराला आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्थिक मंदीचा प्रभाव जाणवल्यानंतर दरकपातीचा आमचा निर्णय योग्य होता, हे
सिद्ध झाले. 
महागाईवरही लक्ष च्दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेला वृद्धी गतिमान राहील याची जशी काळजी आहे, तशीच ती महागाई वाढणार नाही याचीहीआहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थव्यवस्थेत पुरेशी गंगाजळी असणे आवश्यक आहे. तसेच गंगाजळी अतिरिक्त होऊन महागाई वाढणार नाही, याकडेही रिझर्व्ह बँकेचे लक्ष असते.

Web Title: The Reserve Bank predicted a recession in February - Governor Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.