भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:55 AM2023-07-05T09:55:21+5:302023-07-05T09:55:41+5:30

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली.

Reshuffle begins in BJP; State presidents of four states have changed | भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

googlenewsNext

- संजय शर्मा

नवी दिल्ली : मोदी मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष हटवून नवीन नियुक्त्या केल्या आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलापूर्वी भाजप संघटनेत आणखीही अनेक नियुक्त्या होणार आहेत. मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपमधील फेरबदलाची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. यात सर्वांत आश्चर्यकारक नाव केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांचे आहे. बंदी संजय यांच्या जागी त्यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. पंजाबमध्ये अश्विनी शर्मा यांना हटवून भाजपने मागील वर्षीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झालेले सुनील जाखड यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे.  भाजपने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार यांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केले आहे. लवकरच आणखीही काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष हटवले जाऊ शकतात. 

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग
केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतरच मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपले आहे. कोणाचे मंत्रिपद जाईल आणि कोणाचे राहील, हे कोणालाही माहिती नाही.केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर बंदी संजय यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.अशाच प्रकारे राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिने आधीच राजीनामा दिल्याने त्यांचे नावही केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत चर्चेत आले आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हर्ष चौहान यांना मंत्री केले जाऊ शकते. 

भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणिसांची होणार नियुक्ती
पुरंदेश्वरी यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रीय सरचिटणिसांची नियुक्ती होणार आहे. याचप्रमाणे आणखी दोन राष्ट्रीय सरचिटणिसांना प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन केंद्रीय मंत्र्यांनाही भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस केले जाऊ शकते. 

Web Title: Reshuffle begins in BJP; State presidents of four states have changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा