केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:15 PM2022-09-24T12:15:00+5:302022-09-24T12:15:08+5:30

नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी : शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

Reshuffle in Union Cabinet? Shinde group is also likely to be included | केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

Next

हरीश गुप्ता 
 लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत. भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहेत आणि २०१९ मध्ये विजय मिळवू न शकलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचे काम पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन होऊ शकते, असे संकेत आहेत. 

मध्य प्रदेशात नवा चेहरा देऊन शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला बोलाविण्याचा विचार मोदी करत आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या अनुभवाचा गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. मंत्रिमंडळात मुस्लिमांना प्रतिनिधित्व न दिल्याने चुकीचा संदेश गेलेला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिद आणि मदराशांना भेटी दिल्याची घटनाही अलीकडेच घडली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ११ राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे कठीण काम मोदींपुढे आहे. 

...तर ‘त्या’ मंत्र्यांना  बाहेरचा रस्ता 
महत्त्वाची मंत्रालये पाहणाऱ्या काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यामुळे त्यांचे विभाग बदलले जाऊ शकतात किंवा त्यांना बाहेरचा दरवाजा दाखविला जाऊ शकतो. शिवसेनेच्या शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. जनता दल युनायटेड आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मंत्रिमंडळातून यापूर्वीच बाहेर पडलेली आहे. भाजपाला बिहारमध्ये रणनीती पुन्हा आखावी लागणार आहे.

Web Title: Reshuffle in Union Cabinet? Shinde group is also likely to be included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.