केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:53 AM2021-06-28T05:53:37+5:302021-06-28T05:53:47+5:30

मंगळवारी पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक

A reshuffle in the Union Cabinet is inevitable, a meeting of the Prime Minister, Nadda and Shah | केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक

googlenewsNext

हरिष गुप्ता

नवी दिल्ली : फेरबदलासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अटळ असून प्रस्तावित फेरबदल आणि विस्ताराला अंतिम स्वरुप दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी बैठक होत आहे. आधीच लांबणीवर पडलेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विविध राज्यांतील नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांशीही यावर सल्लामसलती करण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीचा आढावाही घेतला आहे. पंतप्रधानांनी ३० जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीही बोलावली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. तथापि, अद्याप याचा निर्णय झालेला नाही. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा अवधी छोटा असू शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या २६ ते २७ सदस्यांनी वाढू शकते आणि स्वतंत्र प्रभार असलेले तीन (पान ६ वर)

या नावांची चर्चा
n भाजपमधून भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी आणि पक्षाबाहेरील तज्ज्ञांसह नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. संयुक्त जनता दल(जेडीयू) आणि अपना दल या दोन मित्र पक्षांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
n सर्वानंद सोनोवाल (आसाम), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश), वरुण गांधी (उत्तर प्रदेश), दिलीप घोष (पश्चिम बंगाल) अनिल बालुनी (उत्तराखंड), अनुप्रिया पटेल (अपना दल) यांची वर्णी लागू शकते.

Web Title: A reshuffle in the Union Cabinet is inevitable, a meeting of the Prime Minister, Nadda and Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.