मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

By मोरेश्वर येरम | Published: January 16, 2021 02:18 PM2021-01-16T14:18:33+5:302021-01-16T14:22:29+5:30

राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे.

resident Doctors Of Ram Manohar Lohia Hospital Refusing To Take Covaxin | मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

googlenewsNext
ठळक मुद्देभारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन'वर डॉक्टरांना शंका?निवासी डॉक्टर म्हणाले आम्हाला कोव्हिशील्ड द्या, कोव्हॅक्सीन नको!राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्राने खळबळ

नवी दिल्ली
देशात आजपासून कोरोना लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पण दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात लशीकरणाची मोहीम सुरू होण्याआधीच मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सीन' ऐवजी 'कोव्हिशील्ड' लस टोचली जावी अशी मागणी करणारं पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहीलं आहे. 

दरम्यान, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रानुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. "रुग्णालयात आजपासून कोरोना लशीकरणाची मोहिम सुरु करण्यात येत असल्याचं आम्हाला कळलं. पण यात भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना देण्यात येणार आहे. पण कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लशीबाबत काही शंका आहेत. याशिवाय यामुळे लशीकरणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना दिली जावी", असं डॉक्टरांनी पत्रात नमूद केलं आहे. 

एम्सच्या संचालकांनी 'कोव्हॅक्सीन' बाबत केलं होतं मोठं विधान
दिल्लीत आज कोरोना लशीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या काळात कोविड योद्धा म्हणून पहिल्या फळीत राहून जीवाची बाजी लावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. पण त्याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सीनचा उल्लेख 'बॅकअप' असा केला होता. पण गुलेरिया यांच्या या विधानावर भारत बायोटेकच्या संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

एम्सच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीही कोव्हॅक्सीनला नाकारलं
कोव्हॅक्सीनच्या चाचणीमध्येही एम्सच्या कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवला नव्हता. कोव्हॅक्सीनच्या चाचणीवेळी एम्समध्ये स्वयंसेवकही खूप कमी होते. चाचणीत सहभागी होण्यासाठी मोबाइल मेसेज पाठविण्याची वेळ आली होती. पण आता तीच लस एम्समध्ये कर्मचाऱ्यांना टोचण्यासाठी पाठविण्यात आली आहे. दरम्यान, एम्समध्ये कोव्हॅक्सीनची चाचणी झालेली असून ती सर्व पातळ्यांवर सुरक्षित असल्याचं याआधीच जाहीरही करण्यात आलं आहे.  
 

Read in English

Web Title: resident Doctors Of Ram Manohar Lohia Hospital Refusing To Take Covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.