निवासी डॉक्टरांचा आजपासून देशव्यापी संपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:00 AM2021-12-29T06:00:11+5:302021-12-29T06:00:29+5:30
Resident doctors : नीट व पीजीचे समुपदेशन होण्याच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : नीट व पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी सरकारने त्वरित समुपदेशन करावे, अशी मागणी करणाऱ्या दिल्लीतील डॉक्टरांवर पोलिसांनी सोमवारी केलेल्या बळाच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोशिएशनने बुधवारपासून देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
नीट व पीजीचे समुपदेशन होण्याच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुनावणी होणार आहे.