निवृत्त सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण, राहुल गांधींची सुटका

By admin | Published: November 2, 2016 02:21 PM2016-11-02T14:21:14+5:302016-11-02T21:03:18+5:30

राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं

The resignation of the retired army's suicide, Rahul Gandhi's release | निवृत्त सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण, राहुल गांधींची सुटका

निवृत्त सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण, राहुल गांधींची सुटका

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये आता खडाजंगी सुरु झाली आहे. राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुटका केली.
आज दुपारी राहुल गांधी गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेले असता त्यांना पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले व सुटका केली. त्यानंर पुन्हा संध्याकाळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गांधींची काही तासानंतर सुटका करण्यात आली. याआधी गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसून गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  
 
('वन रँक, वन पेन्शन'ची मागणी पूर्ण न झाल्याने निवृत्त सैनिकाची आत्महत्या)
 
राहुल गांधी यांना सांगूनही रुगणालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती विशेष आयुक्त एम के मिना यांनी दिली आहे. तसंच कुटुंबिय राजकीय नेत्यांशी संपर्क साधून निदर्शन करण्याचा प्रयत्न करत होते, हे रुग्णालय असून आंदोलनाची जागा नाही असं एम के मिना बोलले आहेत. 
 
मनिष सिसोदिया यांच्यासोबत काही काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनादेखील पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश करु दिला नाही. राहुल गांधी यांनी मोदी नवा भारत तयार करत असल्याची टीका केली आहे.
 
राम किशन गरेवाल यांनी राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. भिवानी जिल्ह्यातील बुमला गावात ते राहत होते. राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनसंबंधी तक्रार करायची होती. त्यासाठी त्यांना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांची भेट घेण्यास नकार देण्यात आल्याने राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं कळत आहे.  
 
सुबेदार राम किशन गरेवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. 'त्यांनी आम्हाला फोन केला होता. वन रँक वन पेन्शनसंबंधी आमच्या मागण्या सरकार पुर्ण करु शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं', अशी माहिती त्यांचा मुलगा राम किशन गरेवाल यांनी दिली आहे.
 

Web Title: The resignation of the retired army's suicide, Rahul Gandhi's release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.