व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

By Admin | Published: April 5, 2016 10:02 PM2016-04-05T22:02:26+5:302016-04-05T22:02:26+5:30

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

Resignation of traders on resignation | व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

googlenewsNext
गाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

मंगळवारी केळीचे भाव, केळी खरेदी, बोर्डावरील भावांच्या तुलनेत कमी भाव देणे अशा मुद्द्यांवर बाजार समितीमध्ये केळी व्यापार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन दुपारी करण्यात आले. बैठकीत सुमारे तासभर बैठकीत चर्चा झाली. पण अनेक निर्णयांना प्रमुख केळी व्यापार्‍यांनी विरोध केल्याने बैठकीत शाब्दीक वाद झाले. शेवटी काही व्यापार्‍यांनी नमते घेतले.
निम्मेपेक्षा अधिक संचालकांची दांडी
केळीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकर्‍यांसाठी तो संवेदनशील आहे. असे असताना बैठकीला फक्त सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, संचालक प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. अर्थातच निम्मेपेक्षा अधिक संचालकांनी या बैठकीला दांडी मारली.

या निर्णयांना विरोध
विनापरवाना केळी खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला १० हजार रुपये दंड केला जाईल, केळीची खरेदी करताना मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्यावरच करावी लागेल या निर्णयांना व्यापार्‍यांनी विरोध केला. याच मुद्द्यावरून उपसभापती चौधरी व रऊफ शेठ कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. हा निर्णय मान्य नसेल त्यांनी बैठकीत स्पष्ट करावे... आपला परवाना बाजार समितीकडे परत करून आपला व्यवसाय थांबवावा, असा संताप चौधरींनी व्यक्त केला. सभापती नारखेडे व इतर संचालकांनी हा वाद मिटविला.

बोर्डाप्रमाणे खरेदी का करीत नाही?
केळीचा भाव ६०० रुपये असला तर व्यापारी आखूड केळी, मंदी अशी कारणे सांगून २०० रुपये क्विंटलमागे कमी देतात. शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे काम व्यापार्‍यांनी मागील दोन वर्षे केले, असा दावा संचालकांनी केला.

कांदेबागाचे भाव जळगावहून असावेत
रावेरात कांदेबागाचे क्षेत्र मोजके आहे. जळगाव व चोपडा तालुक्यात कांदेबागाचे क्षेत्र अधिक असते. यामुळे जळगाव बाजार समितीने कांदेबागाचे भाव काढावेत, असामुद्दाउपसभापतीचौधरीयांनीलोकमतशीबोलतानामांडला.



Web Title: Resignation of traders on resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.