भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 03:37 PM2024-09-07T15:37:17+5:302024-09-07T15:37:30+5:30

भाजपात राजीनाम्यासाठी लागलेली रांग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. हरियाणा निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

Resignations will not stop even on the third day in BJP haryana election; Ramram to the party of 72 leaders | भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही म्हणून भाजपाने नेते पक्षावर कमालीचेच रुसलेले दिसत आहेत. थोड्या थोडक्या नाही तर तबब्ल ७२ नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपात राजीनाम्यासाठी लागलेली रांग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. हरियाणा निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

या नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर दिल्लीतून सुत्रे हलू लागली असून माजी मंत्री कर्णदेव कंबोज आणि सावित्री जिंदल यांना दिल्लीला बोलविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करू शकतात. या दोघांच्या शनिवारी रात्री किंवा रविवारी हिसारला परतण्याची शक्यता आहे. जिंदल यांचे समर्थक पुढच्या आदेशाची वाट पाहत आहेत. 

कोणाचेही तिकीट बदलले जाणार नाही, असे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी राज्य कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. नाराजीचे सूर भाजपातच नाहीत तर काँग्रेसमध्येही उमटले आहेत. हिसारहून कार्यकर्ते थेट दिल्लीला पोहोचले असून त्यांनी राज्याचे प्रभारी दीपक बाबरिया यांच्या गाडीसमोरच घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. 

माजी आमदार रामनिवास घोडेला आणि नरेश सेलवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना तिकीट देऊ नये, अशी या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. बहादूरगडमध्ये काँग्रेस नेते राजेश जून यांनी ११ सप्टेबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला असून नाहीतर अपक्ष लढणार असल्याचा इशारा दिला आहे. 
 

Web Title: Resignations will not stop even on the third day in BJP haryana election; Ramram to the party of 72 leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.