आरक्षणामुळे गाव पुढार्‍यांवर राजकीय गंडांतर ! निवडणूक : ४५ गावांतील ४२३ पैकी २३४ जागांवर महिलाराज

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:33+5:302015-02-14T23:51:33+5:30

औसा : तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी जून-जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे़ त्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली आहे़ प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ४५ गावांत ४२३ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत़ यापैकी २३४ महिला सदस्य निवडले जाणार आहेत़ पुरुषांना मात्र केवळ १८९ जागा मिळणार आहेत़ यातही पुन्हा अनुसूचित जाती आणि नामाप्र सर्वसाधारण या दोन संवर्गाचे आरक्षण आहे़ परिणामी, गाव पुढार्‍यांवर आता राजकीय गंडांतर येणार असल्याने हे पुढारी हवालदिल झाले आहेत़

Resolutions due to the political union of village leaders! Election: Mahilaraja of 234 seats out of 42 villages in 45 villages | आरक्षणामुळे गाव पुढार्‍यांवर राजकीय गंडांतर ! निवडणूक : ४५ गावांतील ४२३ पैकी २३४ जागांवर महिलाराज

आरक्षणामुळे गाव पुढार्‍यांवर राजकीय गंडांतर ! निवडणूक : ४५ गावांतील ४२३ पैकी २३४ जागांवर महिलाराज

googlenewsNext
ा : तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी जून-जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे़ त्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली आहे़ प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ४५ गावांत ४२३ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत़ यापैकी २३४ महिला सदस्य निवडले जाणार आहेत़ पुरुषांना मात्र केवळ १८९ जागा मिळणार आहेत़ यातही पुन्हा अनुसूचित जाती आणि नामाप्र सर्वसाधारण या दोन संवर्गाचे आरक्षण आहे़ परिणामी, गाव पुढार्‍यांवर आता राजकीय गंडांतर येणार असल्याने हे पुढारी हवालदिल झाले आहेत़
औसा तालुक्यातील ४५ गावांतील ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले़ या प्रभाग आरक्षणावरील आक्षेपाची मुदत संपली आहे़ तालुक्यातील ४५ पैकी माळुंब्रा/ तुंगी खु़, बर्‍हाणपूर/हाळदुर्ग आणि तळणी/तळणीतांडा या तीन ठिकाणच्या प्रभाग आरक्षणावर आक्षेप नोंदविण्यात आले़ १०८ ग्रामपंचायतीपैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत़ स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे़ त्यानुसार निवडणूक विभागाने महिला आरक्षण जाहीर केले आहे़ ४५ गावांतून एकूण ४२३ सदस्य निवडले जाणार आहेत़ प्रभाग आरक्षणात यातील ४२३ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत़
४५ गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ६१ तर सर्वसाधारणसाठी १३१ अशा २३४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत़ उजनी ग्रामपंचायतीत १५ सदस्य असून, त्यामध्ये ८ महिला आहेत़ सेलू, तपसेचिंचोली, तुंगी बु़, टाका, नागरसोगा, भेटा, नांदुर्गा, कारला, सत्तरधरवाडी, हारेगाव, तळणी येथे प्रत्येकी ११ जागा असून, त्यापैकी ६ जागा महिलांसाठी आहेत़ लामजना येथे १७ जागा असून, ९ महिलांसाठी राखीव आहेत़ भादा आणि खरोसा येथे प्रत्येकी १३ जागा असून, ७ जागा महिलासाठी राखीव आहेत़ तर जिथे ९ जागा आहेत तेथे महिलांसाठी ५ आणि ७ जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्येमहिलांसाठी ४ जागा आरक्षित आहेत़

Web Title: Resolutions due to the political union of village leaders! Election: Mahilaraja of 234 seats out of 42 villages in 45 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.