पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

By admin | Published: November 13, 2015 12:53 AM2015-11-13T00:53:36+5:302015-11-13T00:53:36+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे

Responsibility to be defeated! | पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

Next

पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे, असे पक्षाचे खासदारद्वय शत्रुघ्न सिन्हा आणि भोला सिंह यांनी केली आहे.
‘बेजबाबदार’ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुधवारी भाजपा नेतृत्वाने दिला होता. परंतु त्याचा कसलाही परिणाम या दोन नेत्यांवर झालेला दिसत नाही. ‘आम्ही जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता कामा नये,’ असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, तर ‘मूलभूत अपयशाबाबत आत्मचिंतन करण्यात आले पाहिजे,’ असे मत खा. भोला सिंह यांनी व्यक्त केले.
शत्रुघ्न सिन्हा यांनी, बिहार निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या निवेदनाचे स्वागत केले आहे.
‘निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या मानहानीकारक पराभवामुळे आम्ही अतिशय दु:खी झालो आहोत. आम्हाला या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता येणार नाही,’ असे चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
‘आम्ही मित्र, तत्त्वज्ञ, गुरू, मार्गदर्शक आणि त्यांच्या चार जणांच्या चमूचे अनुसरण करण्याची हीच योग्य वेळ आणि काळाची गरज आहे. खरे पाहता रिले दौड प्रारंभ झाली आहे. गँग आॅफ फोरने लक्ष्यावर जोरदार वार केला आहे,’ असे चित्रपटातून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार या चार वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले असतानाच सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे.
मागील एका वर्षात पक्ष प्रभावहीन बनविण्यात आला आहे आणि काही मूठभर लोकांच्या हाती जाण्यास बाध्य करण्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या चारही नेत्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते.
पराभवाच्या कारणांची समीक्षा करण्याची मागणीही या निवेदनात केली होती.
आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले असते तर बिहार निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले असते, असे विधान आपण केल्याचा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टपणे इन्कार केला. आपल्याला निवडणूक प्रचार करू दिला असता तर परिस्थिती वेगळीच असती, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
मोदींची जादू टिकावू नाही
दरम्यान बेगुसरायचे भाजपा खासदार भोला सिंह म्हणाले, ‘मोदींची जादू टिकावू नाही हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. बिहार निवडणूक प्रचारातील मोदींचे भाषण अशोभनीय होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीतून लोकांच्या मनावर ‘मोदी जादू’चा परिणाम होण्यास मदत झाली. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्याने ती जादू कुठेच दिसत नाही.’
भोला सिंह यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ‘सत्तेच्या नशेत गुंग असलेले पक्ष नेतृत्व नेहमीच खुशामत करणाऱ्यांनी वेढलेले दिसत होते,’ असे ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हांच्या मताशी सहमती दर्शविताना ते म्हणाले, ‘ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को. प्रत्येकाचा विश्वास असणारे नेतृत्व असावे. सध्या अशा नेतृत्वाचा अभाव आहे. या पराभवासाठी शहाच जबाबदार आहेत. आपल्यामुळे विजय झाल्याचा तुम्ही दावा करता आणि त्या आधारावर पक्षाध्यक्ष बनता. मग पराभवासाठी अडवाणींना दोष द्यायचा काय?’
भोला सिंह यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे, हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Responsibility to be defeated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.