सीबीएसईच्या उर्वरित परीक्षा होणार १ ते १५ जुलैदरम्यान, नवे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:55 AM2020-05-19T03:55:44+5:302020-05-19T05:59:33+5:30
या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : सीबीएसई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षांंच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा. तसेच, पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर सोबत
आणावे.
या निर्देशात असेही म्हटले आहे की, पालकांनी याची दक्षता घ्यावी की, विद्यार्थी आजारी नाही. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सीबीएसईने कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ २९ प्रमुख विषयांची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगलीमुळे स्थगित झालेल्या १७ प्रमुख विषयांच्या (दहावी ६ आणि बारावी ११) परीक्षांचा समावेश आहे, तर पूर्ण देशात १२ वीच्या केवळ १२ प्रमुख विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात येतील.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सीबीएसईच्या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
परीक्षेनंतर शाळा सुरूकरण्याची तयारी
- देशात सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हे पाऊल म्हणजे, शाळा सुरूकरण्याची तयारी म्हणून बघितले जात आहे. एनसीईआरटीकडून यासाठी गाईडलाईन तयार करून घेण्यात आली आहे. एनसीईआरटीचे संचालक डॉ. हृषिकेश सेनापती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शाळा पुन्हा सुरूकरणे आवश्यक आहे.
50% विद्यार्थी पहिल्या दिवशी आणि उर्वरित ५० टक्के दुसºया दिवशी असा प्रस्ताव सरकारला दिला आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, नव्या वर्षाचे प्रवेश आॅनलाईन करण्यासाठी शाळांना सांगितले आहे. काही ठिकाणी राज्यांनी ३० टक्के शिक्षकांना बोलवून काम सुरूकेले आहे.
१२ वीचे वेळापत्रक
तारीख विषय
१ जुलैै होम सायन्स
२ जुलै हिंदी
७ जुलै आयटी आणि
कॉम्प्युटर
सायन्स-
इनफॉर्मेशन
प्रॅक्टिस (जुने
आणि नवे)
९ जुलै बिझनेस स्टडीज
१० जुलै बायोटेक्नॉलॉजी
११ जुलै भूगोल
१३ जुलै समाजशास्त्र