भारतीय तरुणांच्या इराक दौ-यावर निर्बंध

By admin | Published: December 4, 2014 10:09 AM2014-12-04T10:09:41+5:302014-12-04T10:09:41+5:30

कल्याणमधील चार तरुण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील तरुणांच्या इराकवारीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

Restrictions on Indian youths visit to Iraq | भारतीय तरुणांच्या इराक दौ-यावर निर्बंध

भारतीय तरुणांच्या इराक दौ-यावर निर्बंध

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २४ -  कल्याणमधील चार तरुण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील तरुणांच्या इराकवारीवर निर्बंध घालण्यात आले आहे. ३० वर्षांपेक्षा कमी वय, अविवाहीत मुस्लिम तरुणांचेअर्ज स्वीकारु नका असे निर्देश सर्व टूर ऑपरेटर्सना दिले आहेत.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी कल्याणमधील चौघे तरुण मेमध्ये धार्मिक यात्रेच्या नावाखालीच इराकमध्ये गेले होते. यातील आरिफ माजिद हा परतला असला तरी उर्वरित तिघे जण अजूनही इराकमध्येच आहेत. या प्रकाराची टूर ऑपरेटर्सनीही गंभीर दखल घेतली आहे. व्हिसाची सुविधा देणा-या इराक सरकारच्या अलशाया नसीर या यंत्रणेने भारतातील टूर ऑपरेटर्सना निर्देश दिले आहेत. ३० वर्षांपेक्षा कमी वय, अविवाहीत आणि एकटेच इराकला निघालेल्या तरुणांचे अर्ज स्वीकारु नका असे स्पष्ट निर्देश या यंत्रणेने दिले आहेत. विशेष बाब म्हणजे टूर ऑपरेटर्सनेही या निर्देशांचे स्वागतच केले आहे. 'यामुळे आमच्या व्यवासायावर परिणाम होईल पण सध्याच्या बदललेल्या स्थितीनुसार नवी नियमावली आणण्याची गरज आहे' असे एका टूर ऑपरेटरने सांगितले. इराकमध्ये धार्मिक यात्रेसाठी भारतातून दरवर्षी सुमारे २५ ते  ३० हजार लोंक जातात. 
 
 

Web Title: Restrictions on Indian youths visit to Iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.