'या' राज्यात लग्नात येणा-या पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध

By admin | Published: February 21, 2017 06:00 PM2017-02-21T18:00:34+5:302017-02-21T18:00:58+5:30

लग्न समारंभात येणा-या पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध, सरकारच्या आदेशानुसार लग्नसमारंभासाठी मुलीकडील मंडळी...

Restrictions on the number of guests coming to the wedding in 'this' state | 'या' राज्यात लग्नात येणा-या पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध

'या' राज्यात लग्नात येणा-या पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 21 - जम्मू-काश्मीर सरकारने लग्न समारंभात येणा-या पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध घातले आहेत. सरकारच्या आदेशानुसार लग्नसमारंभासाठी मुलीकडील मंडळी 500 जणांना तर मुलाकडील मंडळी 400 जणांना लग्नाचं आमंत्रण देऊ शकतात. तर छोट्या कार्यक्रमांसाठी ही संख्या 100 इतकी असणार आहे. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
1 एप्रिल 2017 पासून हा आदेश लागू होणार आहे.  याशिवाय जम्मू-काश्मीर सरकारने सरकारी किंवा खासगी कार्यक्रमांमध्ये फटाके आणि लाउडस्पीकर वापरण्यावरही बंदी घातली आहे. तसेच आमंत्रणपत्रिकेसोबत देण्यात येणा-या मिठाई आणि सुकामेवावरही बंदी घालण्यात आली आहे. 

Web Title: Restrictions on the number of guests coming to the wedding in 'this' state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.