‘कॅट’चा निकाल जाहीर

By admin | Published: December 28, 2014 01:10 AM2014-12-28T01:10:43+5:302014-12-28T01:10:43+5:30

व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी १६ व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.

The result of 'CAT' | ‘कॅट’चा निकाल जाहीर

‘कॅट’चा निकाल जाहीर

Next

नवी दिल्ली : नव्याने सुरु होणाऱ्या सहांसह देशातील १९ ‘इंडियन इन्स्टिट्यूट्स आॅफ मॅनेजमेंट’ (आआयएम) आणि अन्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी १६ व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.
परीक्षा दिलेले १.६८ लाख विद्यार्थी दुपारपासून निकालाची वाट पाहात होते. अखेर सा. ७ च्या सुमारास निकाल जाहीर झाले तेव्हा ते आॅनलाइन पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली की निकालाची ्र्रेूं३.ंू.्रल्ल ही वेबसाइट बराच वेळ क्रॅश झाली. निकाल अधिकृतपणे जाहीर करताना परीक्षेचे निमंत्रक डॉ. रोहित कपूर म्हणाले, यंदा एकूण १६ परीक्षार्थींनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले. मात्र यात आयआयटींतील कितीजण आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या वर्षी आठ विद्यार्थ्यांनी १०० तर १० जणांनी ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळाले होते. यंदा परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला. गुणांच्या ‘नॉर्मलायझेशन’च्या गेल्या वर्षीच्या पद्धतीवरून कोर्टकज्जे झाले होते. त्यामुळे यावेळी त्यातही सुधारणा केली गेली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मुंबई : इंडियन इन्स्टियूट आॅफ मॅनेजमेंट आणि बी स्कूल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेचा निकाल शनिवारी संध्याकाळी सात वाजता जाहीर होणार होता. परंतु निकाल वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटतर्फे १६ आणि २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कॅट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. वेबसाईट हँग झाल्याने रात्री उशिरापर्यंत अनेकांना निकाल पाहता आला नाही. याबाबत आयआयएम अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. ९९ शहरांमधील ३५४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १ लाख ९६ हजार ९५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

 

Web Title: The result of 'CAT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.