जेवण वाढायला उशीर केला म्हणून पत्नीची गोळी घालून हत्या
By admin | Published: July 10, 2017 09:52 AM2017-07-10T09:52:07+5:302017-07-10T10:51:20+5:30
जेवण वाढायला उशीर केला या क्षुल्लक कारणावरुन पतीने गोळ्या घालून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 10 - जेवण वाढायला उशीर केला या क्षुल्लक कारणावरुन पतीने गोळ्या घालून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. आरोपी अशोक कुमारला (60) पोलिसांनी अटक केली आहे. मानसरोवर पार्क कॉलनीत शनिवारी रात्री 11.45 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित सुनैना यांच्या डोक्याला गोळी लागली होती. त्यांना तात्काळ जवळच्या सर्वोदया रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना आणलं तेव्हाच मृत घोषित केलं.
"पेशंटला रुग्णालयात आणलं त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची नाडी तपासली असता बंद पडली होती", अशी माहिती रुग्णालयाचे सीएमओ निरज गार्ग यांनी दिली आहे.
आणखी वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कुमार यांच्याकडे मालकीचा मिनी ट्रक आहे. आपला लहान मुलगा टिंकूसोबत ते मिनी ट्रक चालवतात. मोठा मुलगा रिंकू टॅक्सी चालवतो. रिंकूने केलेल्या तक्रारीच्या आधारे शनिवारी रात्री उशिरा कवी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा रिंकू, त्याची पत्नी सोनी आणि दोन्ही मुलं घरात उपस्थित होते. जेव्हा भांडण सुरु झालं आणि गोळीचा आवाज आला तेव्हा मुलं घरात झोपलेली होती अशी माहिती मोठा मुलगा रिंकूने दिली आहे.
""रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माझे वडिल घरी आले होते. ते पुर्णपणे दारुच्या नशेत होते. रात्री 11 वाजता त्यांनी आईकडे जेवायला मागितलं. आईने लगेच जेवण मिळू शकत नाही सांगितल्यावर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. यानंततर जेवण वाढायला उशीर करत असल्याच्या रागातून वडिलांनी बंदूक काढून धमकावण्यास सुरुवात केली. मी आणि माझ्या पत्नीने मध्यस्थी करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी गोळी चालवली, जी थेट आईच्या डोक्याला लागली. गोळी लागल्यानंतर ती तिथेच कोसळली", अशी माहिती रिंकूने दिली आहे.
"आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अटक केली आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घरातून काडतूस आणि बंदूक जप्त केली आहे. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली बंदूक अवैध असून ती कोठून मिळाली याचा तपास पोलीस करत आहेत.