CBSE 10th Result 2018: दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:02 PM2018-05-28T15:02:15+5:302018-05-28T18:04:08+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिका-यानं दिली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शिक्षा सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विरवरून याची माहिती दिली आहे. दहावीचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता लागणार आहे. सीबीएसई 10वीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी 16.88 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या 2018च्या (10वी आणि 12वीच्या संयुक्त) परीक्षेला जगभरातून 28 लाख विद्यार्थी बसले होते.
Results of CBSE Class 10 examinations for 2017-18 to be declared by 4 pm tomorrow. pic.twitter.com/SIXtYOc17Y
— ANI (@ANI) May 28, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे 10वी आणि 12वीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.