Retail Inflation March 2023: सामान्यांना मोठा दिलासा; मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 5.66 टक्क्यांवर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:24 PM2023-04-12T19:24:59+5:302023-04-12T19:29:59+5:30

गेल्या दोन वर्षांपासून देशातील किरकोळ महागाईदर 6 टक्क्यांच्या वर होता, जी RBI ची सर्वोच्च मर्यादा आहे.

Retail Inflation March 2023: Big relief for common man; Inflation rate in the month of March at 5.66 percent | Retail Inflation March 2023: सामान्यांना मोठा दिलासा; मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 5.66 टक्क्यांवर आला

Retail Inflation March 2023: सामान्यांना मोठा दिलासा; मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 5.66 टक्क्यांवर आला

googlenewsNext


Retail Inflation March 2023: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून कडक आर्थिक धोरण अवलंबत आहे. त्याचा परिणाम आता महागाईच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे. सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. मार्च 2023 मध्ये हा 6 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. हा गेल्या 15 महिन्यांतील नीचांकी आहे.

गेल्या वर्षी महागाई दर 6.95 टक्के होता
सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.66 टक्के होता. डिसेंबर 2021 नंतरची ही नीचांकी पातळी आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घट हे त्याचे कारण आहे. मात्र, या काळात धान्याच्या दरात वाढ झाली आहे. या वस्तूंचा महागाई दर 15.27 टक्के आहे. महागाई दर 4 टक्के ठेवण्याचा आदेश आरबीआयला मिळाला आहे. आरबीआयने यासाठी किमान 2 टक्के आणि कमाल 6 टक्के मर्यादा निश्चित केली आहे. हा मार्च 2023 मध्ये 5.66 टक्क्यांवर आले आहे, तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये ते 6.95 टक्के होता.

शहरी आणि ग्रामीण महागाई दर
दुसरीकडे, शहर आणि गाव पातळीवर स्वतंत्रपणे पाहिल्यास, मार्च 2023 मध्ये, शहरी स्तरावर किरकोळ महागाईचा दर 5.89 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 5.51 टक्के होता. तर गेल्या वर्षी मार्चमध्ये हा अनुक्रमे 6.12 टक्के आणि 7.66 टक्के होता. तर फेब्रुवारी 2023 मध्ये शहरांमध्ये महागाई दर 6.10 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 6.72 टक्के होता.

दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला होता
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये महागाई दर 7.79 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. 2023 च्या पहिल्या दोन महिन्यांची आकडेवारी पाहिली तर, जानेवारीमध्ये हा 6.52 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के होता. किरकोळ चलनवाढीचा दर सलग तीन तिमाहीत 6 टक्क्यांच्या वर राहिला, फक्त नोव्हेंबर 2022 मध्ये तो 5.88 टक्क्यांवर आला होता. तर डिसेंबर 2021 मध्ये हा 5.66 टक्के होता.

खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या
ग्राहक किंमत निर्देशांकात जेव्हा महागाईची गणना केली जाते, तेव्हा त्यात फूड बास्केटचा मोठा वाटा असतो. भूड बास्केटमधील महागाई मोजण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक तयार केला जातो. त्यानुसार मार्च 2023 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.79 टक्के होता, जो मार्च 2022 मध्ये 7.68 टक्के होता. तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा 5.95 टक्के होता.

Web Title: Retail Inflation March 2023: Big relief for common man; Inflation rate in the month of March at 5.66 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.