खळबळजनक! लाच देण्यासाठी निवृत्त कर्मचारी वर्षानुवर्षे मागतोय भीक, हैराण करणारं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 01:11 PM2023-09-17T13:11:07+5:302023-09-17T13:16:44+5:30

एका निवृत्त झालेल्या व्यक्तीकडे भीक मागणं हा शेवटचा उपाय आहे.

retired employee has been begging for years to pay bribe | खळबळजनक! लाच देण्यासाठी निवृत्त कर्मचारी वर्षानुवर्षे मागतोय भीक, हैराण करणारं प्रकरण

फोटो - hindi.news18

googlenewsNext

लोक रस्त्यावर अनेकदा भीक मागताना दिसतात. एका निवृत्त झालेल्या व्यक्तीकडे भीक मागणं हा शेवटचा उपाय आहे. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. बेगुसरायच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयाजवळ पॉवर हाऊस रोड, सदर ब्लॉक येथे राहणारे मोहन पासवान यांच्याकडे विभागीय अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचा हक्क मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. 

मोठी रक्कम असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पैसे उभे करणे शक्य नसल्याने ते भीक मागू लागले. या पैशातून पुढे लाच देऊन विभागाकडून आपलं काम करून घेण्याची आशा आहे. मोहन पासवान यांचा भीक मागतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहन यांनी सांगितले की, सरकारी अधिकाऱ्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना भीक मागावी लागते. 

सरकारी अधिकाऱ्याला देण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना दोन लाखांची लाच द्यायची आहे. मोहन पासवान हे हातात एक बोर्ड घेऊन बसले आहेत. ज्यावर जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी लाच मागत असून ते सेवानिवृत्त असल्याचं लिहिलं आहे. त्यांच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून त्यांना भीक मागावी लागते. सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लाच मागितल्यामुळे भीक मागत असल्याचं मोहन पासवान यांच्या बोर्डवर लिहिलं आहे.

मोहन पासवान यांनी सांगितले की 1993 मध्ये रोलर ड्रायव्हर पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात जाऊन वेतनश्रेणीसाठी दरवाजा ठोठावला. न्याय मिळाला आणि आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परवानगीही दिली. पण डीडीसी सुशांत कुमार यांनी अकाउंटेंट दया सागर यांना भेटण्यास सांगितलं.

अकाउंटेंटची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून वेतनश्रेणीचा लाभ मिळू शकला नाही. शेवटी आता लाच मागून दोन लाख रुपये जमा करत आहेत. भीक मागताना पाहून कोणीतरी अधिकारी त्यांची असहायता समजून घेईल, अशी आशा मनोज पासवान यांना आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: retired employee has been begging for years to pay bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.