निवृत्त अधिकाऱ्यांना नव्या नोकरीसाठी प्रमाणपत्र अनिवार्य
By admin | Published: December 22, 2015 02:43 AM2015-12-22T02:43:25+5:302015-12-22T02:43:25+5:30
निवृत्तीनंतर स्वयंसेवी संस्थांमध्ये व्यावसायिक पदांवर काम करताना अधिकारी आणि बाबूंना विशेषत: आपल्या आधीच्या सेवेसंबंधी रेकॉर्ड स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : निवृत्तीनंतर स्वयंसेवी संस्थांमध्ये व्यावसायिक पदांवर काम करताना अधिकारी आणि बाबूंना विशेषत: आपल्या आधीच्या सेवेसंबंधी रेकॉर्ड स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना दिले जाणारे वेतन-भत्ते आणि अन्य आर्थिक लाभ औद्योगिक दर्जाशी सुंसगत आहेत की नाही हेही स्पष्ट करावे लागेल. आयएएस, आयपीएस आणि अन्य सेवेतील अधिकाऱ्यांसाठी नवे नियम लागू असतील. व्यावसायिक नोकरी स्वीकारताना त्यांना सरकारकडून पूर्वपरवानगी मिळविण्यासाठी आधी दोन वर्षांचा असलेला कालावधी आता एक वर्षावर आणण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना रुजू व्हायचे आहे अशा संस्थेला तीन वर्षांच्या अखेरच्या सेवाकाळात सामरिकदृष्ट्या संवेदनशील माहिती पुरविलेली नसावी. माझा सेवाकाळ विशेषत: देशाच्या एकात्मतेबाबत स्वच्छ राहिला असून मी मिळवणार असलेले भत्ते किंवा आर्थिक लाभ हे औद्योगिक दर्जाशी सुसंगत आहेत, असे प्रतिज्ञापत्र नमूद करणे अपरिहार्य राहील.(लोकमत न्यूज नेटवर्क)