‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 12:47 AM2021-01-02T00:47:30+5:302021-01-02T00:47:52+5:30
बुल कुमार या नावाने परिचित असलेले नरेंद्र कुमार हे धाडसी योद्धा आणि भारतातील उत्कृष्ठ गिर्यारोहकांपैकी एक होते.
नवी दिल्ली : सियाचीन हीरो म्हणून ओळखले जाणारे कर्नल (निवृत्त) नरेंद्र ‘बूल’ कुमार ‘(८७) यांचे गुरुवारी लष्कराच्या इस्पितळात निधन झाले. सियाचीन ग्लेशियरच्या आसपासच्या भागात पाकिस्तान हालचाली त्यांच्या नजरेस पडल्या होत्या. त्यांच्या अहवालावरुन सियाचिन ग्लेिशियर आणि आसपासच्या भागावर कब्जा करण्यासाठी भारताने एप्रिल १९८४ मध्ये ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम राबविली होती.
बुल कुमार या नावाने परिचित असलेले नरेंद्र कुमार हे धाडसी योद्धा आणि भारतातील उत्कृष्ठ गिर्यारोहकांपैकी एक होते. १९७० च्या अखेर आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी सियाचीन ग्लेशियर भागात अनेक मोहिमा पार पडल्या. सियाचीन ग्लेशियरच्या सामरिक महत्त्वासंदर्भात नकाशांसह अभ्यासपूर्वक निरीक्षणे नोंदवून ठेवली.