29 वर्ष सेवा बजावून TU-142M नौदलातून निवृत्त
By admin | Published: March 30, 2017 06:08 PM2017-03-30T18:08:11+5:302017-03-30T18:08:11+5:30
भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला बुधवारी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
आराकोनम, दि. 30 - भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला बुधवारी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. TU-142M विमानाने 29 वर्ष नौदलात सेवा बजावली. तामिळनाडूच्या आराकोनम येथील आयएनएस राजालीतळावर पार पडलेल्या या निरोप संमारंभला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, व्हाईस अॅडमिरल एचसीएस बिस्ट आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टेहळणी आणि पाणबुडी विरोधी मोहिमांमध्ये TU-142M विमानाचा वापर करण्यात आला. मालदीवच्या कॅक्टस ऑपरेशनमध्ये TU-142M विमानाने महत्वाची भूमिका पार पाडल्याची आठवण सुनील लांबा यांनी सांगितली. 1999 साली प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये सहभागी झालेले टीयू नौदलाचे पहिले विमान होते.
TU-142M चे वैमानिक आणि देखभाल कर्मचा-यांचे लांबा यांनी कौतुक केले. त्यांच्या मेहनतीमुळे इतकीवर्ष प्रभावीपणे या विमानाचा उपयोग करता आल्याचे लांबा यांनी सांगितले. आता P-8I स्कवाड्रनकडे भारताच्या सागरी सीमेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. TU-142M चे शेवटचे कमांडींग ऑफीसर योगेंद्र मायर यांनी कमांडर व्ही रंगनाथन यांच्याकडे सूत्रे सोपवली. ते बोईंग P-8I स्कवाड्रनचे ते पहिले कमांडींग ऑफीसर आहेत.