AIPMT परीक्षा पुन्हा घ्या - सुप्रीम कोर्टाचे आदेश

By admin | Published: June 15, 2015 12:33 PM2015-06-15T12:33:58+5:302015-06-15T12:37:20+5:30

प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी (एआयपीएमटी) पुन्हा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Retry AIPMT Exam - Supreme Court Order | AIPMT परीक्षा पुन्हा घ्या - सुप्रीम कोर्टाचे आदेश

AIPMT परीक्षा पुन्हा घ्या - सुप्रीम कोर्टाचे आदेश

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १५ - प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी (एआयपीएमटी) पुन्हा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आगामी चार आठवड्यात ही परीक्षा पुन्हा घ्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने म्हटले असून यामुळे देशभऱातील साडे सहा लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. 
३ मे रोजी देशभरात एआयपीएमटीची चाचणी पार पडली होती. मात्र या परीक्षेतील पेपर फुटल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची पाळेमुळे हरियाणा व अन्य राज्यातही पसरल्याचे स्पष्ट झाले होते.  त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सोमवारी निकाल देत ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश दिले. 

Web Title: Retry AIPMT Exam - Supreme Court Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.