पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 08:46 AM2024-08-19T08:46:41+5:302024-08-19T08:48:49+5:30

गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा  आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे.

Returns to the party, but will the Chief Minister? Ghulam Nabi Azad again in Congress? | पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

- सुरेश डुग्गर

जम्मू : विधानसभा निवडणुकीची घाेषणा हाेताच जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकीकडे काॅंग्रेसने नॅशनल काॅन्फरन्स (एनसी) आणि पीडीपीसाेबत आघाडी स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे पक्षातून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची घरवापसी करविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आझाद यांच्याशी चर्चा करण्यास सांगण्यात आले. 
गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे.  गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा 
आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे.

कोण येणार एकत्र ?
भाजपचा पराभव करण्यासाठी समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेत एनसी आणि पीडीपी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहे.
त्याचवेळी काॅंग्रेसनेदेखील या पक्षांसाेबत आघाडीचे संकेत दिले आहेत. काॅंग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची गरज आहे.

भाजप स्वबळावर
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी हा निर्णय जाहीर केला. भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी जी. किशन रेड्डी, सरचिटणीस तरुण चुघ आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्ष काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकताे, असेही रैना यांनी सांगितले.

Web Title: Returns to the party, but will the Chief Minister? Ghulam Nabi Azad again in Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.