व्हिडिओ रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनाचेही मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 09:55 PM2020-09-17T21:55:24+5:302020-09-17T21:55:42+5:30
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर, माधुरी दीक्षित पासून ते रजनीकांत व चिरंजीवीपर्यंत कलाकारांनी आणि सचिन तेंडुलकपासून ते ब्रेट लीपर्यंतच्या क्रिकेटर्संने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यानीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात, देशातील सेलिब्रिटीजनेही मोदींच्या कामाचे कौतुक करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या वादग्रस्त म्हणून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगनानेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर, माधुरी दीक्षित पासून ते रजनीकांत व चिरंजीवीपर्यंत कलाकारांनी आणि सचिन तेंडुलकपासून ते ब्रेट लीपर्यंतच्या क्रिकेटर्संने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेल्या शुभेच्छांबद्दल कलाकार व दिग्गजांचे आभार मानले आहेत. बॉलिवूडची क्वीन आणि सध्या शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेत असलेल्या कंगना राणौतने मोदींना व्हिडिओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आपल्यासारखे पंतप्रधान देशाला लाभले हे आमचं भाग्य असल्याचं कंगनाने व्हिडिओत म्हटलं. देशातील कोट्यवधी लोकं आपल्यावर प्रेम करतात, मीही त्यापैकीच एक असून आपणास भेटण्याचा योग आला, पण बोलणं कधीही झालं नाही, अशी खंतही कंगनाने बोलून दाखवली.
Thankful for your birthday wishes Kangana Ji. https://t.co/oTBRGlVJUh
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनाचे हे ट्विट रिट्विट करत कंगनाजी आपले आभार असे म्हटले आहे. मोदींनी बहुतांश नेते व सेलिब्रिटींचे ट्विट रिट्विट करत शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. सध्या, कंगना आपल्या ट्विटवरुन शिवसेना, काँग्रेस नेते आणि काही बॉलिवूड कलाकारांना टार्गेट करत आहे. त्यामुळे, तिच्या प्रत्येक भूमिकेकडे मीडियाचे व नेटीझन्सचे लक्ष लागले आहे.